• ग्रामस्थांनी दिला एकात्मतेचा संदेश
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामपंचायत सोनपुरी, तालुका साकोली तर्फे "मेरी माटी मेरा देश" अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच घनश्याम कठाने, ग्रामसेवक किशोर उके, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांचे हस्ते विधिवत पूजन करून गावातील भजनी मंडळासह संपूर्ण गावात प्रभातफेरी काढून प्रत्येक शेतकऱ्यांकडून मूठभर माती आणि भूमीहीनांकडून चिमुटभर तांदूळ मान्यवरांच्या हस्ते अमृत कलशात संग्रहित करून ग्रामपंचायतमध्ये आणण्यात आले. ह्या अमृत कलशामध्ये जमा झालेली माती व तांदूळ गटविकास अधिकारी प.स. साकोली यांचेकडे जमा करण्यात येणार असून त्यानंतर जिल्हा व राज्यस्तरावर कलाशतील माती पोहचविण्यात येईल. जमा माती व तांदूळ हुतात्म्यांच्या समर्थनार्थ दिल्ली येथे तयार करण्यात आलेल्या अमृत वाटीकेत १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वापरण्यात येणार आहे. ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. या शिवाय ग्राम स्वच्छता अभियान आणि पोषण अभियानात ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचा परिचय दिला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सरपंच घनश्याम कठाने, ग्रामसेवक किशोर उके, उपसरपंच टेकेस्वर तरोने, ग्रामपंचायत सदस्य शरद ब्राम्हणकर, चंद्रकिर्ती जांभूळकर, देवांगना गेडाम, रीमा गेडाम, तंटामुक्त समिती सदस्य कोमल शिवणकर, पोलिस पाटील तिलोत्तमा कठाने, आशा स्वयंसेविका वंदना टेंभूर्णे, आयसीआरपी निशा ब्राम्हणकर, मुख्याध्यापक सय्यद, सहाय्यक शिक्षक काशिनाथ राऊत, अंगणवाडी सेविका जयश्री वालदे, मदतनीस भारती कठाने, संगणक परिचालक पद्माकर तरोने, शिपाई नाना उके यांचेसह महिला स्वयंसहाय्यता बचत गट पदाधिकारी व सदस्या, युवक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या