Ticker

6/recent/ticker-posts

युवारंग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच : पालकमंत्री गुलाबराव पाटील


चित्रा न्युज प्रतिनिधी
जळगाव:- ''युवारंगसारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून यातून भावी काळात करिअर साठी नक्कीच लाभ होणार आहे'' .असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते.

यावेळी अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आ. सुरेश्‍ भोळे, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, महोत्सवाचे कार्याध्‌यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा.संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी पाटील, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य एस.एन. भारंबे, राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र. अधिष्ठाता प्राचार्य एस.एस.राजपूत, प्राचार्य ए.पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲङ प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲङ प्रवीणचंद्र जंगले, रुपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन यांची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या