Ticker

6/recent/ticker-posts

पाडळी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) युवा आघाडीच्या नामफलकाचे उदघाटन


गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,

औरंगाबाद :-केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पैठण तालुक्यातील पाडली(गाझीपुर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) युवा आघाडी शाखा नामफलकाचे उदघाटन दि,८/१०/२०२३ रविवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्य संघटक सचिव मा.अमोल भैया नरवडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पैठण तालुका अध्यक्ष मा.जगन्नाथ मामा साळवे,पैठण तालुका उपाध्यक्ष विष्णु दादा खंडागळे,पैठण तालुका उपाध्यक्ष गौतम सोनवणे,पैठण शहर युवा आघाडीचे अध्यक्ष किरण आटविसावे,तात्या,राजु भाई पिंजारी,गोविंद बर्फे,राजेश नाडे,रहिम भाई शेख,सुनिल साळवे,संदीप निकाळजे,यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी मार्गदर्शन करताना अमोल भैया नरवडे म्हणाले की,या महाराष्ट्रात जिल्हा तालुका गाव तांडा वस्ती येथे रिपाई (आठवले) च्या शाखेचे उदघाटन होत आहे.आणि गावागावात आपले खुप मोठे संघटन  मजबुत होत आहे.कुनालाही अडचन आल्यास मला किंवा तालुक्यातील पदाधिकारी यांना कळवा तुमच्या सर्व अडचणी दुर केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही.आणि येत्या  १४ ऑक्टोबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दलीत पँथर सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे या दलीत पँथर सुवर्ण महोत्सवाला आपन मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवहान नरवडे यांनी केले.यावेळी आकाश गायकवाड,विकास जाधव,सुधिर निकाळजे,कल्यान गायकवाड,बाळु गायकवाड,संतोष निसर्गे यांच्यासह पाडळी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या