Ticker

6/recent/ticker-posts

रुईभर भीमनगरात वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम संपन्न !


मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज महाराष्ट्र, उपसंपादक मो,9860179256


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तमाम भारतीयांना "मूलभूत अधिकार" एक समानच दिले आहेत.त्यामुळे त्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण,संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे,मग तुम्ही कोणत्या ही जाती धर्माचे असा ! त्यामुळं या भारतातील कोणताही "नागरिक" मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो त्याचे मूलभूत अधिकार जर मनुवादी/गांधीवादी विचारधारा खतम करत असेल तर "मूलभूत अधिकारा" शिवाय भारतीय नागरिक "गुलामच" आहे.हे नीटपणे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण आपल्या भारतात वर्ण व्यवस्थे प्रमाणे 85% बहुजन "शूद्र-अतिशूद्र" आहे.- विजय अशोक बनसोडे

उस्मानाबाद : -  तालुक्यातील मौजे रुईभर  भिमनगर येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ता. उस्मानाबाद आणि शांतीसागर तरुण मंडळ,रुईभर ता.जि.उस्मानाबाद द्वारा आयोजित वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रम कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे, ता सरचिटणीस उमाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपास्थिती मध्ये आज दि 09/10/2023 रोजी,सायंकाळी 07.30 वाजता,संपन्न झाला.यावेळी बौध्द उपासिका भिवराबाई सिरसाठे,सुनिताताई सिरसाठे,सुशीलाताई बनसोडे,प्रियंकाताई सिरसाठे,आशाताई बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत सामूहिक पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी विजय बनसोडे यांनी संविधानाची अंमलबजावणी का होत नाही आणि तथागतांचा कर्म सिद्धांत या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्याच बरोबर बाबासाहेब बनसोडे,उमाजी गायकवाड,सुरेंद्र बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन अरविंद बनसोडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सुरेंद्र बनसोडे यांनी मानले.त्याच बरोबर या वर्षांवासाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारनाथ ग्रुप सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.तर यावेळी अशोक (नाना) सिरसाठे, संजय गायकवाड,प्रल्हाद बनसोडे, दत्ता (भाऊ) बनसोडे, नितीन सिरसाठे,बापू सिरसाठे  यांच्यासह वर्षावासाच्या धम्म प्रवचणाच्या कार्यक्रमास रुईभर  भीमनगरातील उपासक व उपासिका बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या