Ticker

6/recent/ticker-posts

प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी घडतांना बिघडतांना कार्यक्रमाचे आयोजन…

संतोष पाटील  जिल्हा प्रतिनिधी जळगाव..

जळगाव:- जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय व महिला मंच, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी घडताना बिघडताना हा कार्यक्रम प्रताप महाविद्यालयाच्या कै. काकासाहेब राणे सभागृहात पार पडला. 
         इ.११ वी व १२ वी च्या युवक-युवतींनी वाढत्या वयाबरोबर काय करावे? व काय करू नये ? याबाबत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची संवाद साधत संजय गोविलकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 
    याप्रसंगी प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला व  उपस्थिती राहून  कार्यकमाचा लाभ घेतला.
   सदर कार्यक्रमाचे प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. जैन सर यांच्या मार्गदर्शनाखाली   आयोजन करण्यात आले.  
       याप्रसंगी महाविघालयाचे  उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे ,पर्यवेक्षक प्रा. आर. एम. पारधी , प्रा. बी.आर. गुलाले , प्रा.बापू संदानशिव, प्रा.मंदाकिनी भामरे प्रा.शालिनी पवार प्रा.कविता माळी प्रा.मेघना पवार प्रा.कीर्ती पाटील प्रा.पुनम चोपडे प्रा.श्वेता पाटील प्रा. पूनम शिंदे यासह महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या