Ticker

6/recent/ticker-posts

पैठण जि. प.कन्या शाळेच्या प्रवेशद्वारा समोर साचले दुर्गंधीयुक्त घाण पाणी,,,,,,,,,,,,

 
 गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधीऔरंगाबाद
मो.8308128457,

औरंगाबाद :-पैठण शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रवेशद्वारा च्या संरक्षण भिंतीला खेटून असलेल्या नालीत मागील दोन महिन्या पासून हिरवे शेवाळ आलेले दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचले असल्याने शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरून विद्यार्थी आजारी पडत आहेत या शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी अनेक वेळा नगर परिषदेकडे याची तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने पालकांमधे नगर परिषदेच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
पैठण शहरातली पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रवेशद्वारा जवळील मोकळ्या जागेत मागील दोन महिन्यापासून हिरवेगार शेवाळ असलेले दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचे साम्राज्य पसरले असुन यामुळे शाळेच्या आवारातच नाहीतर या परीसरात दुर्गंधी युक्त वातावरण निर्माण झाले आहे.या शाळेच्या बाजूलाच बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा परिसर असून या शाळे शेजारील रस्त्यावरून या स्मारकाकडे जाण्यासाठी नागरिकांची सतत वर्दळ असते तसेच शाळेच्या प्रवेशद्वरा समोरील  पैठण पोलीस स्टेशनच्या  मोकळ्या जागेत असलेल्या घाणीमुळे या ठिकाणी उभे राहणे सुद्धा शक्य होत नाही.
या दोन्ही  ठिकाणचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा सात दिवसानंतर छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांना देण्यात आलेले आहेत.यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, सचिव भगवान सोरमारे, युवा तालुकाध्यक्ष विशाल काळे, प्रतीक गावंडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या