Ticker

6/recent/ticker-posts

पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून तालुक्यात होतोय गुटख्याचा पुरवठा,

अन्न व औषध प्रशासनाचे या विषाकडे सपशेल दुर्लक्ष.......

 
 गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457

औरंगाबाद :- महाराष्ट्र राज्य मध्ये विक्री करण्यास बंदी आसलेल्या जिवघेना व नसेली गुटखा हा पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत आसलेल्या ढोरकिन,बालानगर पिंपळवाडी (पि), मुधलवाडी, नारायणगाव तसेच कामगाराची वसाहत असणाऱ्या गणेशनगर,साखर कारखाना,जैन स्पिनर स्टॉप या भागासह तालुक्यातील ईतर गावात सर्रासपणे या जीवघेण्या नशा आणणाऱ्या गुटख्याचा पुरवठा होऊन विक्री केली जात आहे याकडे अन्न व औषध प्रशासनासह व स्थानीक पोलीसानी याकडे जानुन बुजून दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्य सरकारने राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी घातली असली तरी शेजारच्या राज्यातुन छुप्या व अवैध्य मार्गाने राज्यात येणारा माणिकचंद, विमल, हिरा,गोवा, राज निवास या नावाचे व ईतर झिंग आनणारा  गुटखे या एम आय डी सी पोलीस ठण्याच्या हद्दीत वास्तव्यास आसलेल्या गुटखा डीलरकडे कोणतीही अडचण न येता
पोहचत आहे.मग तो डीलर स्वतः व आपल्या एजेंट मार्फत 
विशेषत: तालुक्यातील पिंपळवाडी फाटा, वाहेगाव, मुधलवाडी, नारायनगाव, बालानगर, ढोरकिन,साखर कारखाना,जैन स्पिनर स्टॉप, गणेशनगर, साईनगर, ईसारवडी, धनगाव वाहेगाव या परिसरातील लहान मोठे दुकाने व चहा पाण्याचे हॉटेल आणि  टपऱ्यावर हा जिवघेणा गुटखा कधी दुचाकी तर कधी चार चाकी वाहनाने पोलीसांच्या समोरून बेमालूम पद्धतीनें पुरवठा करतांना दिसत आहे.पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या या गुटखा डीलरने तालुक्यातच नाही तर  जिल्ह्याचा ठिकाणी ही गुटखा पुरवठा करन्याचे काम रोखठोकपणे करत आसून या गुटखा डीलर कडे अन्न व औषध व स्थानीक पोलीसांनी छुप्या अर्थिक सबंधामुळेच दुर्लक्ष करत आसल्याची चर्चा आहे.



या पुर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकारी अर्चना पाटील यांनी व अन्न व औषध सुरक्षा आधिकारी जाधवर,पी. एस. अजिंठेकर आणि फरीद सिद्दीकी यांनी केलेल्या संयुक्त कारवायीमधे जवळपास १८ते १९ लाखाचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई करून या परिसरातील गुटख्याच्या अवैध व्यवसायाला आळा घातला होता परंतू त्यानंतर बऱ्याच दिवसाासून या गुटखा विक्री व पुरवठा करणाऱ्यावर कोणतीही कडक कारवाई न झाल्याने या गुटखा पुरवठादाराने  तालुक्यांत आपले चांगलेच बस्तान बसवले आहे.



एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत आसलेल्या बालानगर, पिंपळवाडी, जैन स्पिनर स्टॉप, व गणेशनगर या भागाला गुटखा विक्रीचे व पुरवठा करण्याच्या मोठे केंद्रच बनविले आसून या ठिकाणा वरूनच तालुकाभर हा जीवघेणा गुटखा पुरवला जात आसून या अवैध्य गुटखा विक्रीच्या व्यवसायातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या