Ticker

6/recent/ticker-posts

"शिक्षण प्रेमी आजोबांनी केला नातीचा वाढदिवस नदीकाठ वस्ती शाळेवर साजरी"

 विजय केदारे तालुका  प्रतिनिधी पैठण जि.छ.संभाजी नगर मो.९९२३१६७४९७

पैठण :- दिनांक ०८/११/२०२३ रोजी ,पैठण तालुक्यातील शेतकरी जयराम अण्णा तेजिनकर  यांना  शिक्षणाची  फार आवड असल्याने व गोर गरीब   विद्यार्थी विषयी. सहान भुती असल्याने  ब्रम्हगव्हाण येथे  आदिवासी समाजातील मुलांन साठी  जिल्हा परिषद प्राथमिक नदी काठ वस्ती शाळा आहे. व त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या कडून फुल न फुलाची

पाकळी मदत करावी असे ठरवले  या कामाचा शुभ दिवस नातीचा जन्म दिवस ठरवला..शाळेत गोर गरीबांची यांची मुले शिकली पाहिजे सर्वांना  शिक्षणाचा अधिकार आहे. या विचाराने  त्यांनी  आपल्या काव्या नावाच्या नातीचा  प्रथम वाढदिवस हा  वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे ठरवले त्यांनी  बाकी  केक.फुगे. इतर मौज मजा डेकोरेशन न करता त्या पैशातून जि प प्रा . नदीकाठ वस्ती शाळा ब्रम्हगव्हण शाळेतील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. 

   तसेच खाउचेही वाटप केले. या वेळी बाल विद्यार्थ्यांचा. चेहऱ्यावरील आनंद दुगुनित  झाला होता. आण्णा यांनी शिक्षणा चे महत्त्व पटवून देत बाल विद्यार्थ्यांना लाख मोलाचे मार्ग दर्शन केले. या वेळी  जि प प्रा . नदीकाठ वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. दराडे सर.
सह शिक्षक  श्री.आर. डी.केदारे सर यांनी जयराम अण्णा तेजिंनकर यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या