• ३ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा विडिंग नाही
• वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा वनरक्षकास आशीर्वाद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- एकूण भुभागापैकी ३३ टक्के जमीन वनाच्छादित असावी. या करिता शासन प्रयत्नशील असून वन विभागाचे अखत्यारीतील पडीक जमिनीवर वृक्ष लागवड आणि संवर्धनावर भर असला तरी वन अधिकाऱ्याच्या वरदहस्तामुळे वनरक्षकाकडून अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार काम केले जात नसल्याचा प्रत्यय लाखनी वन परिक्षेत्रातील सोनपुरी मिश्र रोपवनात आला. मिश्र रोपवनाची लागवड होऊन ३ महिन्याचा कालावधी लोटण्याचे मार्गावर असून सुद्धा पहिलीच विडिंग केली गेली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या प्रकाराने रोपवनातील रोपांची वाढ खुंटली आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे वनक्षेत्रात सातत्याने घट होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे. याचे जीवसृष्टीवर विपरीत परिणामाचा तज्ञांनी इशारा दिल्याने वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे कामास प्राथमिकता देण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त सहवनक्षेत्र तथा वनरक्षक बीट जांभळी/सडक अंतर्गत नियतक्षेत्र सोनपुरी संरक्षित वन ||| मधील १५ हेक्टर पडीक जागेवर राज्य योजना वनिकरणाचा भरगच्च कार्यक्रम अंतर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मिश्र रोपवन लागवडीस उपवन संरक्षक भंडारा यांनी २३ जून २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती.
वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एस. बी. उईके, वनरक्षक के.एस.वंजारी यांचे देखरेख व सनियंत्रणात सागवान, आजन, जांभूळ, आवळा, लिंब, खैर, आंबा, शिशु, मोह, बेहळा, चिंच, बांबू, वड, पिंपळ, इत्यादी प्रजातीची १६ हजार ६६५ रोपे लागवडीकरिता एप्रिल, मे २०२३ मध्ये मजुरांकरवी खड्डे खोदकाम तथा जुलै व ऑगस्ट २०२३ ला मिश्र रोपवन लागवड करण्यात आली. रोपवन लागवडीचे प्रथम वर्षात ३ विडिंग आवश्यक असल्याचे अंदाजपत्रकात दर्शवण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यापैकी रोपवन लागवडीचे जागेत जास्त प्रमाणात गवत, वेली व खुरटी झुडपे असल्यास १५ दिवसात आणि कमी प्रमाणात असल्यास महिनाभरात पहिली विडिंग करावी. असे निर्देश आहेत.
स्थानिक वनरक्षकास वन अधिकाऱ्याचा वरदहस्त तसेच उपवनसंरक्षक कार्यालयात जवळचा नातेवाईक कार्यरत असल्याने आपले कोणी काही बुघडवू शकत नाही. ह्या आविर्भावात त्या वावरत असतात. त्यामुळे मिश्र रोपवन लागवडीस ३ महिन्याचा कालावधी लोटण्याचे मार्गावर असताना सुद्धा विडिंग केली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकाराने लागवड केलेल्या जागेत खेळती हवा राहणार नसल्यामुळे रोपांची वाढ खुंटनार आहे. ही बाब वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना माहिती असताना सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सौजन्य दाखविले गेले नसले तरी सोनपुरी मिश्र रोपवन मात्र विडिंग चे प्रतिक्षेत आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
सोनपुरी मिश्र रोपवन लागवडीचे वेळी विडिंग केली होती. मजूर मिळाले नसल्यामुळे विडींग केली गेली नाही. ३-४ दिवसांत विडिंग चे काम सुरू करू.
*एस.बी. उईके, क्षेत्र सहाय्यक जांभळी*


0 टिप्पण्या