• तहसील कार्यालयावर मोर्चा
• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना समन्वय समितीचे निवेदन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी समन्वय समिती च्या बॅनरखाली राज्यात "माझे कुटुंब माझी पेन्शन" यासाठी बुधवारी(ता.८) दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तथा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांनी २१ ऑक्टोबर ला बांधकाम भवन मार्जबान पथ मुंबई येथे समन्वय समितीची सभा बोलावली होती. त्यात सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वानुमते "माझे कुटुंब माझी पेन्शन" आणि "नो पेन्शन नो वोट" यासाठी हे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. तसेच २००५ नंतर शासकीय, निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या सारख्या १७ मागण्या, माझे कुटुंब माझी पेन्शन आंदोलनात करण्यात आल्या होत्या.
२० नोव्हेंबर पर्यंत जुनी पेन्शन व इतर मागण्या संदर्भात शासन स्तरावर निर्णय न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर १७ लाख कर्मचारी मोर्चा काढणार असून १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याची सरकारला जाणीव व्हावी. या करिता बुधवार(ता.८) संपूर्ण महाराष्ट्रात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. तहसीलदाराचे वतीने शासनाला निवेदन पाठविण्यात आले. शिष्टमंडळात शिक्षक भारती चे कार्याध्यक्ष उमेश सिंगनजुडे, कार्यवाह विनोद किंदर्ले, जिल्हा समन्वय समिती चे समन्वयक रुपेश नागलवाडे, टीकाराम चंदनबटवे, विवेक हजारे, हितेश बोदेले, माधुरी डोंगरे, सुलोचना डोंगरे, सुचिता तावडे, प्रेमदास नामुर्ते, मनीष अवसरे, देविदास मेश्राम, नागेश टीचकूले, नवनीत गोल्हर, सचिन तीतिरमारे, हुसेन कानतोडे, मदन टेंभूर्णे, नाना राघोर्ते, मनीष वंजारी, युवराज कमाने, देवराम फटे, चंद्रकुमार पटले, वामन बोपचे, चेतन उईके, वाय.एस. कांबळी, एम.आर. नांदगावे, एस.बी. राठोड, एस.आर. राघोर्ते, एस.डी. काळे, हरीश बघेले, रंधावा वालकर, यशवंत टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या