सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक मो. नं. 9730901120
रामटेक:- दि. ६ डिसेंबर रोजी हमलापुरी येथील रमाई बुद्ध विहारा मध्ये महापरिनिर्वाण दिना निमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. भिम शाहीर प्रदिप कडबे यांनी आपल्या गीत गायनातुन पूर्ण वातावरण भिम मय करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजवादी, विज्ञान वादी विचार माडत समाज प्रबोधन करुन महामानवाला अभिवादन केले.
या कार्यक्रमला गायक गौतम गजभिये, शैलेश वाघमारे, प्रल्हाद गेडाम, जयदेव गेडाम, गुरुदास मेंढे, केशव मेंढे, व भिम शाहीर प्रदिप कळबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन निलेशजी वाघमारे, ताराचंद बेलसरे, आनंद सोनटक्के रमेश नगरे, तसेच आभार प्रदर्शन निलेश वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्यने गायक व बुद्ध उपासक - उपासिका उपस्थित होते.


0 टिप्पण्या