Ticker

6/recent/ticker-posts

रामटेक येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेबांना रक्तदानातून मानवंदना


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक मो. नं. 9730901120
 
रामटेक:- ६ डिसेंबर २०२३ ब्लड फॉर बाबासाहेब’ या अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामटेक येथे ६८ व्यक्तींनी ऐच्छिक रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या उत्थानासाठी केलेले अपार कष्ट, त्याग व समर्पणाची जाण राखून तळागाळातील माणसाला उपचारादरम्यान भासणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देता यावे या उदात्त हेतूने भारतीय समाजातील विवीध सामाजिक व सेवाभावी संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
        कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रदीप बोरकर, प्रमुख अतिथी आमदार आशिष जयस्वाल, कृ.उ.बा. समिती सभापती सचिन किरपान, पोलिस उपविभागीय अधिकारी आशित कांबळे, ॲड. प्रफुल्ल अंबादे, डॉ. रतिराम खोब्रागडे, मयंकराव देशमुख यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करताना, बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श पुढे घेऊन जाताना ब्लड फॉर बाबासाहेब अभियान द्वारा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजात माणुसकीचा विचार रुजविण्याचे महान कार्य केले जात असल्याबद्दल मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले." कार्यक्रमाचे प्रास्ताविक साक्षोधन कडबे, संचालन वैभव तुरक, आभार शैलेश वाढई यांनी केले. यावेळी लाइफ लाइन ब्लड सेंटर नागपूर यांचे पी.आर.ओ. प्रवीण साठवणे व वैद्यकीय चमूने उत्तमरीत्या रक्त संकलन केले. सर्व रक्तदात्यांना आम्ही भारतीय अभियान तर्फे आभारपत्र प्रदान करण्यात आले. शिबिराचे आयोजन आकाशझेप फाऊंडेशन, भारतीय बौध्द महासभा, रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक, कल्याण मित्र बौध्द विहार समिती शितलवाडी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच रामटेक तालुका, आंबेडकरी युवा विचार मंच रामटेक तालुका, पत्रकार संघटना, धम्मज्योति बुध्दविहार समिती यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी, मनीष खोब्रागडे, अमित अंबादे, राजेंद्र कांबळे, सुमित गजभिये, महादेव सरभाऊ, अश्विन सहारे, सतीश सुरुसे, प्रशांत डहारे, नंदकिशोर कुंभरे, सूरज भिमटे, वैभव कोचे तसेच असंख्य नागरिकांनी कसोशीने प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या