चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :-आज नागपूर येथे ह्या तानाशाही सरकार विरोधात विधानसभा घेराव आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे घेण्यात आले,विविध मागण्यांसाठी धाव घेतलेल्या युवकांना असा आपल्या सत्तेचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज करण्यात आला पण हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार आहे.राज्यातील बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, उद्योगधंदे परराज्यात निघून जात आहेत आणि तरुणांचे हाल होत आहेत. सरकारी पदांपेक्षा कंत्राटी नोकऱ्यांवर भाजपचा भर आहे.
या विधानसभा घेराव आंदोलन मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले सहभागी झाले. यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात, मा.मंत्री नितीन राउत, मा.मंत्री सुनील केदार , अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री .श्रीनिवास बी व्ही व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री कुणाल राउत आणि हजारो युवक उपस्थित होते.


0 टिप्पण्या