विविध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील निलागोंदी च्या संत शिरोमणी जगनाडे महाराज सेवा मंडळाचे वतीने ९ व १० डिसेंबर रोज शनिवार आणि रविवार ला संत जगनाडे महाराज चौक निलागोंदी येथे संताजी जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८:०० वाजता पालखी दर्शन व रात्री ८:०० वाजता ह.भ.प. माधुरी बालपांडे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन, रविवारी सकाळी ११:०० वाजता संताजी प्रतिमा रांगोळी रेखाटन स्पर्धा, दुपारी १२:०० वाजता हार स्पर्धा, १२:३० ते ३:०० वाजता गावातील मुले, मुली, महिला व पुरुषांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ३:०० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उद्घाटक वैनगंगा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर, अध्यक्षस्थानी माजी आमदार चरण वाघमारे, सहउद्घाटक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवराम गिरेपुंजे, प्रमुख अतिथी पवनी चे माजी नगराध्यक्ष विलास काटेखाये, उपसभापती गिरीश बावनकुळे, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, अन्न पुरवठा निरीक्षक रोशन कापसे, सिनेट सदस्य मनीष वंजारी, प्राचार्य डॉ. घनश्याम निखाडे, विमा सल्लागार पूजा कुरंजेकर, माजी सैनिक रमेश वंजारी, ओमदेव हटवार, सेवानिवृत्त वनपाल विठ्ठल सेलोकर, अध्यापक प्रेमलाल हटवार, जगदीश हटवार, ओमचंद वंजारी, टेकराम हटवार, गोपाल हटवार, मार्तंड हटवार, अंबिर वंजारी, सुदाम हटवार, युवराज वंजारी, गोवर्धन वंजारी, रंजना वंजारी, चांगदेव वंजारी, किशोर वंजारी, दादाराम वंजारी, रवींद्र हटवार, ज्ञानेश्वर माहूरे, वनरक्षक नंदेश्वर हटवार, वनपाल विनीत हटवार, जेसीबी कॉन्ट्रॅक्टर नितेश वंजारी, प्रमुख उपस्थिती सरपंच वर्षा वंजारी, उपसरपंच महेश हटवार, ग्रामपंचायत सदस्य दिनेश वंजारी, छत्रपती हटवार, सदस्या विद्या हटवार, सुषमा शेंडे, ममता बनसोड, प्रियती वरठे, तमुस अध्यक्ष यशोराज हटवार, उपाध्यक्ष सुभाष हटवार यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर हटवार, उपाध्यक्ष सुभाष हटवार, सचिव महेशकुमार हटवार, सहसचिव विनोद वंजारी, कोषाध्यक्ष विठ्ठल सेलोकर, कार्यवाह तुळशीदास वंजारी आणि सदस्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या