कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा:- काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे प्रमुख उपस्थितीत ११ डिसेंबर रोज सोमवार ला दीक्षाभूमी पासून मॉरिस कॉलेज टी पॉइंट पर्यंत विधान भवनावर काँग्रेस द्वारा हल्लाबोल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या करिता गुरुवार(ता.७) दुपारी २:०० वाजता विश्रामगृह लाखनी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ता अतुल लोंढे, प्रदेश प्रतिनिधी आकाश कोरे, साकोली विधानसभा अध्यक्ष राधेलाल पटले, लाखनी तालुका अध्यक्ष योगराज झलके, युवक आघाडी अध्यक्ष यशवंत खेडीकर यांचे प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली.
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधी, याशिवाय अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तथा मोर्च्यात महिला, युवक, सेवादल, एनएसयुआय, इंटक सह सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोर्च्यात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीत डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, जिल्हा महासचिव राजू निर्वाण, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. शफी लद्धानी, तालुका महिला अध्यक्ष पुष्पा डुंभरे, शहर अध्यक्ष मोहन निर्वाण, महिला शहर अध्यक्ष कल्याणी भिवगडे, तालुका युवक अध्यक्ष यशवंत खेडीकर, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिषा निंबार्ते, विद्या कुंभरे, सरिता कापसे, पंचायत समिती सदस्य विकास वासनिक, सदस्या अश्विनी मोहतुरे, योगिता झलके, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडारे, माजी सरपंच जिजा तुमळाम, सुनंदा धनजोडे, परवेज आकबानी, विनोद भुते, रामुदा अंबादे, विष्णू गिरेपुंजे, हेमंत बांडेबुचे, धनपाल बोपचे, विजय कापसे, विजय सार्वे, रूपचंद सोनवाने, आशिष गभने, अनिल बावनकुळे, नंदू चौधरी, भूपेश शेंडे, कुंदन आगासे, अभिषेक तीतिरमारे, शोयब अन्सारी यांचेसह बहुसंख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या