• गडेगाव येथील घटना
• पती व सासऱ्यासह ६ नातेवाइकांवर गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- २० हजार रुपये महिना व कंपनीसाठी १ लाख रुपये माहेरून आन. या करिता विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना गुरुवारी(ता.७) उघडकीस आली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींची नावे पती दिनेशसिंग दिलिपसिंग कच्छवाय(३४), सासरा दिलिपसिंग सरदारसिंग कच्छवाय(६४), भासरा सुशीलसिंग दिलिपसिंग कच्छवाय(५९), दिपकसिंग दिलिपसिंग कच्छवाय(३७), दिर देवेंद्रसिंग दिलिपसिंग कच्छवाय(३४), ननद पायल दिलिपसिंग कच्छवाय(३४), सर्व राहणार गडेगाव, तालुका लाखनी अशी आहेत.
कुमारी रश्मी हिचे दिनेशसिंग दिलिपसिंग कच्छवाय याचेशी सामाजिक रीतिरिवाजानुसार ३० एप्रिल २०१५ रोजी विवाह समारंभ पार पडला. ऐपतीनुसार विवाहात वधूपक्षाकडून भेटवस्तू दिल्या होत्या. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेले. त्यानंतर पती दिनेशसिंग, सासरा दिलिपसिंग, भासरा सुशील सिंग, दिपकसिंग, दिर देवेंद्रसिंग, ननद पायल यांनी संगनमत करून रश्मीला तू प्रतीमहिना २० हजार रुपये घेऊन ये. तसेच आम्हाला भंडारा येथे कंपनी टाकायची असल्यामुळे माहेरून १ लाख रुपये घेऊन ये. असा तगादा लावून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला जात असे. तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली जायची. तिला छळ असहय्य झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरण पती पत्नीचे असल्याने भरोसा सेल पोलिस मुख्यालय भंडारा यांचेकडे पाठविण्यात आले. पण तडजोड झाली नसल्यामुळे पिडीत रश्मी दिलीपसिंग कच्छवाय(२९) हिचे फिर्यादीवरून तसेच भरोसा सेल चे अहवालावरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ४०२/२०२३ कलम ४९८(अ), ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस हवालदार प्रभा कुलसुंगे तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत आरोपींना अटक केली गेली नव्हती.


0 टिप्पण्या