प्रख्यात रामधाम येथे भव्य समारोह संपन्न
विविध पदाधिकारी, सरपंच - सदस्यांसह महिलांची हजेरी
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक मो. नं. 9730901120
रामटेक:- पर्यटन मित्र, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इतर काही उपाधींनी प्रसिद्धी झोतात असलेले चंद्रपाल चौकसे यांचा वाढदिवस समारोह आज दि. १ जानेवारी २०२४ मनसर येथील प्रख्यात रामधाम तिर्थक्षेत्र येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला. मनसर येथील रामधाम येथे सकाळपासूनच क्षेत्रातील विविध पदाधिकारी, पं.स.सभापती, बि.डी.ओ., सरपंच, सदस्य नागरीक, विविध महिला मंडळ, कार्यकर्ते व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दयारामजी रॉय, तर प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रपाल चौकसे हे उपस्थित होते. प्रारंभी दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विविध पदाधिकाऱ्यांनी आपआपले दोन शब्द व्यक्त करतांना चंद्रपाल चौकसे यांच्या जिवनावर व त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांचे तोंडभरून कौतुक केले. यानंतर केक कापुन चंद्रपाल चौकसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी पती चंद्रपाल चौकसे यांना अक्षवन केले. दरम्यान यावेळी रितेश व त्यांच्या चमुने आपल्या सुमधुर गित गायनाने उपस्थितांना रिझविले. चंद्रपाल चौकसे यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरीकांचे आभार व्यक्त केले. यानंतर महिला - पुरुषांचे जत्थे तथा रामटेक विधानसभा क्षेत्रातील पत्रकारांनी पुष्पगुच्छ, हार तथा शाल व श्रीफळ घेऊन मंचावर गेले व चौकसेंचा सत्कार केला. यावेळी विविध पदाधिकारी, सरपंच, सदस्य, स्थानिक पत्रकार मंडळी तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या