Ticker

6/recent/ticker-posts

कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त मातकुळी येथे मानवंदना


 

चित्रा न्युज प्रतिनिधी
जामखेड -  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक विजय स्तंभाला १ जानेवारीच्या शौर्यदिनी कोरेगाव भीमा येथे राज्यातून आणि कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश यासह देशभरातून आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते, भीमसैनिक, महिला , जेष्ठ नागरिक, लहान मुले यांनी  मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
    भीमा कोरेगाव येथे नवीन वर्षाच्या पहिला दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करून पाचशे शूर वीरांना मानवंदना देण्यासाठी देशातील आंबेडकरी जणता येऊन विजयस्तंभाला मानवंदना देऊन  शौर्याचा निर्धार उराशी बाळगून नववर्षाच्या सुरवात करून अंगी प्रेरणा मिळत असल्याचे बोलले जात आहे. याच शौर्याचा आणि जुन्या चालीरीतींचा समूळ नष्ट करण्यासाठी आणि नवीन प्रेरणा नव युवकाबरोबर समाजाला मिळावी या हेतूने भीमरत्न प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार दिनांक १/१/ २०२४ रोजी सकाळी मातकुळी येथे विजयस्तंभ उभारून विजय स्तंभाला व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना बौद्धाचार्य अशोक निकाळजे यांनी शौर्य दिनाचे महत्त्व सांगितले यावेळी कार्यक्रमाला मातकुळी  तलाठी सज्जाचे तलाठी राजकुमार आचार्य, सरपंच बबन दादा डोके, उपसरपंच विशाल जरे, आप्पासाहेब जरे, विकास जरे, विष्णू डोके, गहीनाथ जरे, पप्पू पाचबैल, अॅड. गोकुळ पाचबैल, नितीन धनवे, गहिनाथ पाचबैल,, देवा आढाव, अक्षय आढाव, बाबा अंकुश आढाव, संदीप आढाव धर्मराज आढाव, बाळू आढाव, नाना आढाव, गणेश आढाव, विनोद समुद्रे, प्रदीप आढाव, सोमनाथ समुद्रे, किशोर आढाव, ऋषिकेश आढाव, मनोज आढाव, आरती जरे, सुरेखा सदाफुले, लक्ष्मी कांबळे, वंदना आढाव, विमल आढाव, केशर आढाव,पद्मावती आढाव, संजना आढाव,मुक्ताबाई आढाव, लताबाई आढाव, गीता धनवे, मंगल आढाव, रंजना समुद्रे, सुलाबाई समुद्रे, अविद्या आढाव, अलका नायकीरे, आदी ग्रामस्थ व  महिला उपस्थित होत्या या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गोकुळ पाचबैल यांनी केले तर आभार भीमरत्न प्रतिष्ठान यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या