Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२४ - ३ जानेवारी 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. १३ पौष १९४५,
युगाब्द  ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : हेमंत
मास: मार्गशीर्ष 
पक्ष: कृष्ण 
तिथी: सप्तमी (१९.५०) ~ अष्टमी   
वार: बुधवार
नक्षत्र : उत्तरा (१४.५०) ~ हस्त  
राशी : कन्या 

*पू. के. वि. बेलसरे पुण्यस्मरण* मुंबई (दिनांकानुसार) 
*सावित्री बाई फुले जयंती*
जागतिक बालिका दिन, 
महिला मुक्तिदिन,
जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन, 
मूलभूत कर्तव्यपालन दिन

२००४:नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९५७:हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५०:पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.
१९४७:अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
१४९६:लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.

जन्मदिवस :
१९३१:य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक 
१९२१:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९२७: ओडीसा चे पूर्व मुख्यमंत्री जानकी बल्लभ पटनायक.
१८३१:सावित्रीबाई फुले – समाजसेविका 

मृत्यूदिन:
२००२:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष 
२०००:डॉ. सुशीला नय्यर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
१९९८:प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य
१९९४:अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक 
१९७५:बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजून उलगडलेले नाही.

*।। दास-वाणी ।।* 

कोसले अथवा काटेंघरें ।
नाना पृष्ठिभागीं चालती घरे । 
जीव करिती लहानथोरें । 
शक्तीनुसार  ।। 

शंख शिंपी घुला कवडे । 
आधीं त्यांचे घर घडे । 
किंवा आधी निर्माण किडे । 
हें विचारावे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०९/०७/०४-०५ 

कोशकिडे किंवा आपल्या भोवती काटेरी घरे तयार करणारे जलचर हे आपापल्या  क्षमतेनुसार स्वत:चे घर तयार करून पाठीवरून वाहून नेत असतात. गरजेनुसार त्यामधेच
राहातात देखील.

शंख शिंपली घुला कवडी अशी छोटी छोटी संरक्षक घरेही अशीच असतात.
आता आधी घर घडते का ती तयार
करणारे प्राणी आधी हा विचार करावा.

उत्तर असे आहे की आधी सूक्ष्म निर्माण होते. मग त्या सूक्ष्मासाठी स्थूलसृष्टी तयार होते. आधी जीव बनतो मग तोच स्वत:साठी घर बनवतो.

विकल्पनिर्शन समास.

🙏💐💐💐💐💐🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या