Ticker

6/recent/ticker-posts

औद्योगिक वसाहतीत 42 कोटी निधीतून सुविधा कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


राकेश आसोले कार्यलय प्रतिनिधी चित्रा न्युज ठाणे 

अकोला : अकोला येथील औद्योगिक वसाहतीत सुमारे 42 कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज येथे झाले.
आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह विविध उद्योजक व मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्र पायाभूत सुविधेअंतर्गत विविध कामांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याने मोठा निधी मंजूर करण्यात आला. त्यात फेज 1, 2 व 3 मधील रस्त्यांचे डांबरीकरण, अकोला विकास केंद्र वाहतूक नगर रस्त्याची सुधारणा आदी विविध कामे होणार आहेत. यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या