रुपाली मेश्राम कार्य संपादिका मो.९५५२०७३५१५
नागपूर :-भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली गावातील अनेक पिढ्या संपुष्टात आल्या. परंतू नागपूर जिल्हातिल
म्हसली हे गाव कायमच रस्त्याच्या बाबतीत दुर्लक्षित होते.रस्ते विकास हा पायाभूत विकासाबरोबर देश विकसित होण्यासाठी हातभार लावणारा भाग आहे. दळणवळण,शिक्षण,शेती,आरोग्य या सर्व कामकाजासाठी रस्त्याची आवश्यकता असते. परंतू हे गाव दुर्लक्षितच राहिले.गावातील कर्तृत्ववान सरपंचा सौ.बाली संघरत्न उके व कर्तृत्ववान ग्रा. पं. सदस्य श्री.राकेश लाखडुजी तिरसागरे, कार्यतत्पर सदस्या सौ.अरुणा विलास मते यांनी ही परिस्थिती बदलण्याचा चंग बांधला.या कामात त्यांनी खूप निवेदने देवून सातत्याने मागील तीन वर्षापासून पाठपुरावा केला.अखेर खासदार निधीअंतर्गत रुपये ४० लक्ष मंजूर झाले.दिनांक ११/०२/२०२४ ला रस्त्याचे उद्घाटन सौ.बाली उके (सरपंचा) व राकेश तिरसागरे (सदस्य) यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत होते.कारण या गावात गाव स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच डांबरीकरण रस्ता होत आहे.


0 टिप्पण्या