अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा
मो 89566470004
वर्धा :- पातुर तालुक्यामध्ये पांढूर्णा या गावामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रवेशद्वार निर्माण केले होते यासाठी मोठा मोर्चा अकोल्यात आम्ही काढला होता तीन-चार दिवस पूर्वी याच कमानीसाठी प्रवेशद्वारासाठी दोन भीमसैनिकांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले कमानीसाठी आत्महत्या सुद्धा करण्याची परिस्थिती आली त्यामध्ये ते दोन्ही भीमसैनिक बचावले त्यांचे प्रकृती अतिशय गंभीर होती परंतु प्रकृती आता ठीक आहे धार्मिक विषयांमध्ये कधी काही होऊ शकते कोणीही कोणता पाऊल उचलू शकते याचा अंदाज नाही म्हणून आज आम्ही पुन्हा पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयावर गेलो आणि तिथे आमच्या भूमिका आम्ही मांडल्या आणि तुम्ही यावर काय भूमिका घेतली हे सुद्धा विचारपूस आम्ही आज केली,सोमवार पर्यंत आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमान या विषयावर आम्ही भूमिका घेऊ असे वरिष्ठांनी आम्हाला आश्वासन दिले,आम्ही हेच मागणी केली की पुन्हा त्या ठिकाणी कमान निर्माण झाली पाहिजे,अन्यथा पुन्हा काय अनर्थ घडील त्या कमानीसाठी कोणी काय करील हे सांगता येत नाही म्हणून तात्काळ हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान निर्माण झाली पाहिजे कारण की हा प्रश्न आता राज्यव्यापी बनला आणि आम्ही हा लढा आता तीव्र केला हा लढा आम्ही असाच रेटून धरून मजबूत करू,आणि रस्त्यावरचा संघर्ष आणि न्यायालयीन लढा लढून पुन्हा कमान त्या ठिकाणी निर्माण करू,जोपर्यंत कमान त्या ठिकाणी लागणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष आम्ही चालूच ठेव आम्हाला बलिदान देण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा आम्ही बलिदान देऊ पण कमान त्या ठिकाणी लागलीच पाहिजे हेच आम्ही इशारा देतो,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाट,सम्राटशोकसेना


0 टिप्पण्या