• सामाजिक कार्यकर्ता ऍड. अमरदिप चवरे यांचे प्रतिपादन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324
भंडारा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे माध्यमातून या देशातील प्रत्येक नागरिकांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले. पण केंद्र शासनाने ४ वेळा कलमा बदलून आपले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. परिवर्तनाचा रथ मोठ्या परिश्रमाने आणला असल्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्तापित करण्याचा यथोचित मार्ग मोकळा झाला. पण त्याची यशस्वी अमलबजावणी झाली नाही. त्यामुळे बहुजन समाजाला आरक्षणासह हक्क व अधिकार पाहिजे त्या प्रमाणात प्राप्त झाले नाही. संवैधानिक अधिकारा प्रती जागृतीचा विस्तव विझू न देता संवैधनिक राष्ट्र निर्मिती प्रती बहुजन समाज अनभिज्ञ आहे. असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ता ऍड. अमरदिप चवरे यांनी धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार समिती दिघोरी/नान्होरी द्वारा बुद्ध विहाराचे अनावरण व भव्य धम्म संमेलनात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार समिती दिघोरी/नान्होरी चे वतीने १८ फेब्रुवारी रोज रविवार ला बुध्द विहाराचे अनावरण व भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य भंते थेरो भिक्खू नंद यांचे हस्ते अनावरण तर अध्यक्षस्थानी माजी समाजकल्याण सभापती रेखा चुन्नीलाल वासनिक, प्रमुख मार्गदर्शक सरकारी अधिवक्ता ऍड. अमरदिप चवरे, सरकारी अधिवक्ता ऍड. सुरेश रामटेके, रेडीअंट आय.एस. अकॅडमी चे ऍड. निलेश डहाट, प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अहिल्या खोब्रागडे, सरपंच शरद ईटवले, आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/दगडी चे अध्यक्ष प्रा. तारेश शहारे, आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, माजी सिनेट सदस्य प्रा. शिलवंत मेश्राम, भगीरथ भात गिरणी चे अध्यक्ष बी. डी. बोरकर, प्रहार चे जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक, डॉ. युवराज मोटघरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गोंडाने यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा मातोश्री रमाई च्या प्रतिमांना माल्यार्पण व मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विहारासाठी भूमी दान देणारे आयु. महादेव मेश्राम, बुद्धमूर्ती दानशुर आयु. सिद्धार्थ मेश्राम तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्तीचे दानदाते आयु. विजय गोंडाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ऍड. निलेश डहाट यांनी बाबासाहेबांचे प्रासंगिक विचार या विषयावर मार्गदर्शन करतांना मानवी जीवनातील मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माला अनुसरून जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे आहे. सुख व दुःख झाले तरी पंचशील व दहा परिमिता अंमलात आणली पाहिजे. धम्मासोबत महामानवाला दिलेल्या आदेशानुसार कल्याणकारी योजना तयार करून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात मानवाच्या मुक्तीचा योग्य प्रमाणात जाणीव सम्यक मार्गाने सक्षम समाज घडवून आणले पाहिजे असे ऍड. निलेश डहाट यांनी सांगितले.
ऍड. सुरेश रामटेके यांनी बाबासाहेब सामाजिक विचारवंत या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की सामाजिक उणिवा, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करीत नाही. तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिद्दीने कसोटीवर प्रामाणिक प्रयत्न करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा. एक समान काम केले तर दुसऱ्या प्रती सहानुभूती निर्माण होते. असा मोलाचा उपदेश ऍड. सुरेश रामटेके यांनी केला. उपस्थित मान्यवरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. रेवाराम खोब्रागडे तर प्रास्ताविक अहिल्या खोब्रागडे आणि आभार सामाजिक कार्यकर्ता दिनेश देशपांडे यांनी मानले. रात्री "एक रात्र बा भीमाची" ह्या स्वप्नील बनसोड यांनी सादर केलेल्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार समिती चे अध्यक्ष रंजित खोब्रागडे, उपाध्यक्ष पंकज खोब्रागडे, सचिव परमानंद जांभूळकर, सहसचिव आशिष खोब्रागडे, कोषाध्यक्ष सुरेश मेश्राम यांचेसह दीपक खोब्रागडे, राजेश खोब्रागडे, संदीप खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या