अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा
मो 8956647004
वर्धा :-नागपुर देशातील मतदारांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका निर्माण झाली झाली आहे. मागील काही वर्षांपासून ज्या पद्धतीने सत्तेसाठी पक्ष फोडले गेले, सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांना खोट्या आरोपात फसवले गेले, विरोधी पक्षांची बँक खाती गोठवण्यात येत आहे हे सर्व बघता ईव्हीएम बाबत असलेली मतदारांची शंका अधिक मजबूत झाली आहे.
निवडणूक आयोग ती शंका दूर करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचाच मार्ग आता आहे. ज्या देशांनी ईव्हीएमचा वापर केला, त्यांनी परत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास सुरुवात केली आहे. मतदारांचा यंत्रणेवर विश्वास नसेल तर ती यंत्रणा लादायची नाही असा निर्णय त्या देशांनी घेतला आहे. आज आपल्या देशातही मतदारांचा यंत्रणेवर विश्वास नाही असे असताना ईव्हीएमचा वापर निवडणूक आयोग का करत आहे?
लोकशाहीत मतदारांची भूमिका महत्वाची आहे. लोकांचा विश्वास जिंकून पारदर्शकपणे निवडणुका झाल्या तरच देशात लोकशाही जिवंत आहे असे म्हणता येईल, परंतु आज तसे चित्र दिसत नाही.
त्यामुळे आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात यासाठी एक मोठे जन आंदोलन देशभर या चर्चासत्रामुळे उभे राहत आहे.


0 टिप्पण्या