अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण
प्रतिनिधी वर्धा
मो 8956647004
वर्धा :- परभणी सामाजिक न्याय मंत्र्याने कोणती आणि कशी कामे करायची असतात, याचा प्रेरणादायी मापदंड निर्माण करणारे निगर्वी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे तब्बल 14 वर्षे लाक्षणिक अर्थाने सत्तेपासून दूर होते. मंत्री तर दूर; ना खासदार ना आमदार ! पण ते विचलित झाले नाहीत. सत्तासुंदरीच्या मागे न लागता पक्षावर अविचल निष्ठा ठेवत काम करत राहिले.
हा फोटो अत्यंत ताजा आहे... राज्यसभा निवडणुकीच्या कामात दिवसभर व्यस्त... नंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीस उपस्थिती लाऊन चंद्रकांत हंडोरे रात्री दीडच्या सुमारास चेंबुरला घरी पोहचले.
भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव आणि एन.के. कांबळे यांच्यासोबत त्यांनी भावी वाटचालीविषयी सुमारे दीड तास चर्चा केली. राज्यसभा खासदार या नात्याने समाजाच्या तळागाळातील लोकांना आपण कसा न्याय शकू, हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता.
हा फोटो मला खूप आवडला. बोलका वाटला. नेत्याने कार्यकर्त्यांवर निर्व्याज प्रेम करायचं असतं ते असं
पराभवानं खच्चून अन् यशानं उन्मत्त व्हायचं नसतं हेच हा फोटो सांगतो
हंडोरे साहेब,
आपल्या सादगीला दिल से सलाम
अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !!
विजयकुमारजी,
आपल्या निष्ठा आणि चिकाटीचा अभिमान वाटतो
चले चलो
कल अपना है
जय जय जय जय
जय भीम
जय संविधान
जय भारत
भीमप्रकाश गायकवाड,
'मूकनायक',
रविराज पार्क, परभणी


0 टिप्पण्या