🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - २२ फेब्रुवारी
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. ३ फाल्गुन १९४५,
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : शिशिर
मास: माघ
पक्ष: शुक्ल
तिथी: त्रयोदशी (१३.२०) ~ चतुर्दशी
वार: गुरूवार
नक्षत्र : पुष्य (१६.४०) ~ आश्लेषा
राशी: कर्क
*गुरू पुष्यामृत योग* (सूर्योदयी ७.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत)
आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस
विश्व विचार दिवस.
१८१९:स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डालरला विकला
१८५४: पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु
१९३१- स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना.
१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडून पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९८०: अफगानिस्तानने मार्शल लॉ ची घोषणा केली.
जन्मदिवस:
१९९४: प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकार
१९७२: महाराष्ट्राचे एन्काऊंटर स्पेशलीस्ट सचिन वाझे.
१९६४: हिंदी चित्रपट दिग्दर्शक सूरज बड़जात्या.
१९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून
१९२२:व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक
१९२०:इफ्तिकार – चरित्र अभिनेता. १८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्ट्झ
१८५७: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल
१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य
१७३२:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
मृत्यूदिन:
२००९:लक्ष्मण देशपांडे – ’वर्हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक
२०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी
२०००:विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार
१९८२:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी
१९४४:कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन
१९२५:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर
१८१५:स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे.
*।। दास-वाणी ।।*
नाना पदार्थांच्या खाणी ।
धातु रत्नांच्या दाटणी ।
कल्पतरू चिंतामणी ।
अमृतकुंडें ।।
नाना दीपें नाना खंडें ।
वसती उद्वसे उदंडें ।
तेथें नाना जीवनाची बंडें ।
वेगळाली ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १६/०३/१५-१६
या पृथ्वीवर कोळसा दगडापासून सोन्या रूप्यापर्यंत असंख्य प्रकारच्या खाणी आहेत. तसेच विविध मौल्यवान रत्ने हिरे माणके देखील पृथ्वीच्या पोटातच आढळतात. कल्पतरू, चिंतामणी, दुर्मिळ अमृतकुंडे ही देखील पृथ्वीमुळेच आपल्याला ज्ञात आहेत.
मोठमोठे खंडप्राय भूभाग आणि पाण्याच्या मधोमध असलेली छोटी मोठी बेटे हा पृथ्वीचाच भाग. या भूतलावर मनुष्यादी असंख्य प्राण्यांची वस्ती जागोजागी अनुकूलतेनुसार आढळते. सर्व प्राणीमात्र जरी ईश्वराचे अंश असले तरी त्यांचे राहाणीमान आणि जीवनपद्धती वेगवेगळी असते. सर्व जीवसृष्टीचा आधार या पृथ्वीतत्त्वाला माझे नमन.
पृथ्वीस्तवन समास.
🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏


0 टिप्पण्या