_जून-जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन_
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी मो,9529944770
मुंबई .राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार असून लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, तर उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरवात होईल...
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरवात होईल..
अशी होणार नवीन पदभरती
▪️जेल शिपाई - १,९००
▪️एमआरपीएफ - ४,८००
▪️पोलिस शिपाई - १०,३००
एकूण - १७,०००
राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल.
नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
आठ दिवसात भरतीची जागा
उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून-जुलैत घेतली जाणार आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गृह विभागाचे त्यादृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यात जवळपास राज्यातील १७ हजार रिक्त पदे असतील.
राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी १० प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार होती. मागच्यावेळी ही क्षमता आठ हजार ६०० करण्यात आली. आता ती आणखी पाच हजाराने वाढवायला सरकारने परवानगी दिली आहे.


0 टिप्पण्या