Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२४ - २४ फेब्रुवारी  
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. ५ फाल्गुन १९४५,
युगाब्द  ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : शिशिर
मास: माघ
पक्ष: शुक्ल     
तिथी: पौर्णिमा (१८.००)  ~ प्रतिपदा          
वार:  शनिवार
नक्षत्र : मघा(२२.२०) ~ पूर्वा                                  
राशी:   सिंह

*माघ पौर्णिमा* (समाप्ती दुपारी ६.००)
*माघ स्नान समाप्त*
गुरू रविदास जयंती 
*संत रोहिदास जयंती* 
श्री मंगेश जत्रोत्सव, गोवे.
श्री कालिकादेवी यात्रा, अक्कलकुवा, नंदूरबार.

*जागतिक मुद्रण दिन*
केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस

१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.
१९२०: नाझी पार्टीची स्थापना 
१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
१९८७: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.
२००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

जन्मदिवस :
१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव. (किल्ले राजगड), 
१९२४: पार्श्वगायक व अभिनेता, प्रसिध्द गझल गायक तलत महमूद 
१९३८: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट 
१९३९: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी 
१९४२: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती 
१९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता 
१९५५: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज 
१९५९: राज्यसभा सांसद अभिषेक सिंघवी.
१९६३: चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी.
१९६६: राज्यसभा सांसद उदयनराजे भोसले.
१९७२:चित्रपट अभिनेत्री तसेच दिग्दर्शक पूजा.
१९९४: सैराट मराठी चित्रपट अभिनेता आकाश ठोसर.

मृत्यूदिन :
१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी "वेडात मराठे वीर दौडले सात" हे काव्य लिहिले आहे.
१८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश 
१८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन.  वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणबुडीचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. 
१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक.
१९७५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन 
१९८६ : भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल
१९९८: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार 
२०११: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै.
२०१८: प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री श्रीदेवी.

*।। दास-वाणी ।।* 

देव दानव मानव । 
अग्नीकरितां चाले सर्व । 
सकळ जनासी उपाव । 
अग्नी आहे  ।। 

लग्ने करिती थोर थोर । 
नाना दारूचा प्रकार । 
भूमंडळी यात्रा थोर । 
दारूनें शोभती  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०५/१४-१५ 

देव असो दानव असो की मानव असो,
प्रत्येकाचे जीवन हे अग्नीवरच सर्वस्वी अवलंबून असते. सर्वांच्याच आयुष्यात अग्नी हा महत्वपूर्ण आधार असतो.

श्रीमंत आणि मानाच्या व्यक्तींच्या घरातले विवाहसोहळे, वरातींमधे भुईनळे चंद्रज्योतीसारख्या विविध प्रकारच्या शोभेच्या दारूचे नेत्रदीपक प्रदर्शन असते. तसेच देवदेवस्थानच्या यात्रा उत्सवांमधेही भव्य दारूकामामुळे मिरवणुकीमधे चैतन्याची लहर पसरते. ही देखील अग्नीचीच अभिव्यक्ती असते.

सर्व जीवसृष्टीचे आयुष्य व्यापून टाकलेल्या या अग्नीदेवतेला माझे वंदन! 

अग्निनिरूपणनाम समास.

🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या