किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड-छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी,नीतिमान आणि स्त्री शक्तीचा सन्मान करणारे राजे होते.त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा तसाच औदार्याचा देखील असून ३३ कोटी देवांची मंदिरे आहेत परंतु ज्यांच एकही मंदिर नाही मात्र सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आणि सर्वांना आपले आराध्या असणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज होते असे मत युवा व्याख्याते अविनाश भारती यांनी व्यक्त केले .आष्टी तालुक्यातील पांढरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी ते बोलत होते .
सालाबादप्रमाणे पांढरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असते.यंदा प्रसिध्द युवा व्याख्याते अविनाश भारती यांच्या छत्रपतींचे चरित्र या विषयावर व्याख्यानमाला संपन्न झाली.यावेळी बोलताना भारती यांनी सांगितले की ,महाराजांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला.त्यांचे राज्य हे १८ पगड जातिधर्माचे होते म्हणूनच ते रयतेचे राजे होते .
महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे.’’ त्यांनी जातिभेद केला नाही, प्रजेतील स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचा राजांनी चौरंग केला होता.तसेच स्त्री-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही . महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य महाराजांनी केले असल्याचे शेवटी अविनाश भारती यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले . यावेळी पांढरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक तसेच महिला भगिनी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .


0 टिप्पण्या