अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा
मो 8956647004
वर्धा आज आरती म्हणत आहात,
उद्या नारळ फोडाल,
परवा नवस बोलाल,
नंतर अंगात येईल,
मग भोंदू महाराज येतील,
मग कर्तुत्वाला चमत्कार समजून,
तुम्ही एका दैदीप्यमान महापुरुषाच्या कर्तुत्वावर पाणी फेराल...
भविष्यातील हा संभाव्य धोका ओळखून,
तात्काळ शिवरायांची आरती म्हणणे थांबवले पाहिजे.
काल शिवजन्मोत्सवी अनेक ठिकाणी पंचारती, कापूर अगरबत्ती लावून,आरतीचे ताट ओवाळत शिवरायांची आरती म्हणण्यात आली..
हे थांबले पाहिजे...
भविष्यातील पिढीला आपण कोणते शिवराय देऊ इच्छितो...काल्पनिक चमत्कारिक देव....? की कर्तृत्ववान महापुरुष...?
कारण एकदा दैवतीकरण झाले म्हणजे शिवरायांचा समग्र पराक्रम केवळ चमत्कारातून घडला ( इकडून हवेत उडाला... तुकडून हवेत उडाला.... हा चमत्कार केला... तो चमत्कार केला ....ह्या स्पीड ने जोरात गेला.... त्या स्पीड ने जोरात गेला.... वगैरे वगैरे... ही सगळी मूर्ख पणाची आणि मानसिक रुग्ण ची लक्षणे आहेत...) असे म्हणायला येथील भोंदूबुवा कमी करणार नाहीत...
शिवाय आपल्या बोकांडी 33 कोटी देव असताना, अजून एखाद्या देवाची आवश्यकता ती कशासाठी..?
मागे एका चित्रकाराने शिवरायांना अनेक हात 4 ते 10 असणारे चित्र रेखाटून शिवरायांचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. काही मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्या चित्राचे भरभरून कौतुक देखील केले होते.
नेमके हे सर्व कशासाठी..?
शिवराय हे देव नाहीत..
शिवराय महामानव आहेत, युगपुरुष आहेत, महापुरुष आहेत.
मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावर, स्वकर्तृत्वातून, पराक्रमातून, संघर्षातून शिवरायांनी निर्माण केलेल्या दैदिप्यमान इतिहासामुळे शिवराय हे एखाद्या काल्पनिक अन चमत्कारिक देव-देवतांपेक्षा निश्चितच कैक पटीने श्रेष्ठ ठरतात...
अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर,
अगदी 33 कोटी देवांची ( बामनांची ) फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते..
तेव्हा अकारण, भावनेच्या भरात दैवी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून शिवरायांना पाहणे थांबवावे ही विनंती...
शिवराय हे जागतिक कीर्तीचे, महापराक्रमी, महान योद्धे, महापुरुष, युगपुरुष, महामानव आहेत....
महत्वपूर्ण सूचना : शिवरायांच्या आरतीला पर्यायी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची वंदना म्हणावी...
जय शहाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय तुकाराम महाराज
प्रा.एम.एम.सुरनर सर
सत्यशोधक व्याख्याते


0 टिप्पण्या