Ticker

6/recent/ticker-posts

हमलापुरी येथे ६० लक्ष रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन

  रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचे शुभहस्ते, पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे यांचा अध्यक्षतेत संपन्न


सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर मो. नं. ९७३०९०११२०

 रामटेक :- रामटेक तालुक्यातील हमलापुरी (चीचाळा) येथे हनुमान मंदिर परिसरात भागवतचार्य ह. भ. प. नागपुरे महाराज यांचा सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताह कथेची सांगता आज गोपालकाला व महाप्रसादाने झाली.
भागवत सप्ताह च्या मुहूर्तावर रामटेक पंचायत समितीचे सभापती नरेंद्र बंधाटे यांचा प्रयत्नातून मंजूर झालेले जिल्हा परिषद शाळा हमलापुरी येथे पेवर ब्लॉक लावणे ११.६२ लक्ष रुपये , समाज भवन येथे पेवर ब्लॉक लावणे १० लक्ष रुपये , स्मशानभूमी येथे पेवर ब्लॉक लावणे ६.१६ लक्ष रुपये , बुद्ध विहार येथे पेवर ब्लॉक लावणे ७.३९ लक्ष रुपये ,जिल्हा परिषद शाळा ते पगारवार यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ९.९५ लक्ष रुपये ,शंकर ठकरेले ते जयराम ठकरेले यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ६.५० लक्ष रुपये ,परमात्मा एक भवन ते आत्माराम ठकरेले यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ४ लक्ष रुपये , ग्यानिराम बंधाटे ते जीवन बंधाटे यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ४ लक्ष रुपये असे एकूण ६० लक्ष रुपयाचे विकास कामाचे भूमिपूजन माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा हस्ते संपन्न झाले.
भूमिपूजन प्रसंगी पंचायत समिती रामटेक चे सभापती नरेंद्र बंधाटे, सरपंच कविता बसिने, उपसरपंच सुनील गयगये, पंचायत समिती रामटेक चे A.P.O.अर्जुन खेवले, पंचायत समिती अभियंता प्रमोद गोल्हर, ग्राम पंचायत सदस्य श्रावण ठकरेले, शेषराज मोहारे, ओमेंद्र मोहारे, पार्वताबाई ठकरेले, बबिता दमाहे, नंदकिशोर कोहळे, देवचद ठकरेले, गोपीचंद ठकरेले, रामकिशन ठकरेले, भास्कर गयगये, रामेश्वर ठकरेले, दिनेश ठकरेले, मंसाराम ठकरेले, रामेश्वर दमाहे, महेंद्र बंधाटे, जयपाल बांधते, खुशाल पिसोडे, शंकर ठकरेले, निलेश वाघमारे, सहित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या