Ticker

6/recent/ticker-posts

भिमाई नसती तर दलीतांचा उद्धारकर्ता जन्मला नसता


• आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे यांचे प्रतिपादन 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324

भंडारा:- सुभेदार रामजी आंबेडकर व माता भिमाई चे पोटी चौदावे रत्न म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेऊन पिडीत व वंचित जन समूहाचा उद्धार केला.  मानव कल्याणासाठी जन्मलेला हा कोहिनूर हिरा अख्या विश्वात वंदनीय ठरला. भिमाई नसती तर दलीतांचा उद्धारकर्ता जन्मला नसता असे आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले. ते भिमाई जयंतीचे औचित्य साधून महाप्रज्ञा बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 
            मातोश्री भीमाबाई रामजी सकपाळ यांचे जयंतीचे औचित्य साधून महाप्रज्ञा बुद्ध विहार मुरमाडी/सावरी येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष सुरेंद्र बनसोड, प्रमुख अतिथी आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद देशपांडे, शालिक जांभूळकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विठोबा कांबळे, कवी व साहित्यिक नामदेव कान्हेकर, सामाजिक कार्यकर्त्या ललिता बडगे, वर्षा तिरपुडे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सर्वप्रथम माता भिमाई चे प्रतिमेस माल्यार्पण व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मातोश्री भिमाई चे जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करतांना सुरेंद्र बनसोड यांनी सांगितले की, विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लहान वयातच भिमाई सोडून गेल्याने आई चे प्रेम मिळाले नाही. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रामप्रसाद देशपांडे तर आभार शीला कोटांगले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ता धम्मा रामटेके, रोशन खोब्रागडे, आशिष गणवीर, मिरा रामटेके, शर्मिला खंडारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम बहुसंख्येने बौद्ध उपासक व उपसिका उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या