प्रवीण शेंडे जा. संपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
मो.9834486558
गोंदिया : विकासाच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पुल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे. बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला. परिणामी नागरीकांना १ किमी अंतरावर जाण्यासाठी १५ कीमी फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे. अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर संतप्त झालेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केले आहे


0 टिप्पण्या