Ticker

6/recent/ticker-posts

दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कोटी ४४ लाखाची विकास कामे मंजूर

• लाखनी तालुक्यात१ ५ ग्रामपंचायतीत २७ कामांचा समावेश 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी
मो.95459 14324

भंडारा :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत(दलीत वस्ती) सुधारणा घडवून आणण्याकरिता आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये समाजकल्याण सभापती मदन रामटेके यांचे पुढाकाराने लाखनी तालुक्यातील घोडेझरी, गोंदी/देवरी, गडेगाव, केसलवाडा/वाघ, गराडा, पिंपळगाव, लाखोरी, कनेरी, मुरमाडी/सावरी, रेंगोळा, मचारणा, चांन्ना, मानेगाव, लोहारा, दिघोरी इत्यादी ग्रामपंचायतीत १ कोटी ४४ लाख ३० हजार रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. 
              अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असून गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना समाजकल्याण सभापती मदन रामटेके यांच्या प्रयत्नाने समाजकल्याण समितीत मंजुरी प्रदान करण्यात आली. घोडेझरी सिमेंट रस्ता व बंदिस्त नाली बांधकाम ४ लाख रुपये, गोंदी बंदिस्त नाली ४ लाख रुपये, देवरी सिमेंट काँक्रिट रस्ता ४ लाख रुपये, गडेगाव बंदिस्त नाली व सिमेंट काँक्रिट रस्ता १० लाख ७९ हजार, केसलवाडा/वाघ बंदिस्त नाली बांधकाम १४ लाख, गराडा बंदिस्त नाली बांधकामात ७ लाख, पिंपळगाव/सडक बंदिस्त नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक(गट्टू) १४ लाख, लाखोरी सिमेंट काँक्रिट रस्ता व पेव्हर ब्लॉक(गट्टू) ११ लाख २८ हजार, कनेरी/दगडी बंदिस्त नाली बांधकाम ७ लाख, मुरमाडी/सावरी बंदिस्त नाली व सिमेंट काँक्रिट रस्ता ९ लाख ५३ हजार, रेंगोळा बंदिस्त नाली ७ लाख, मचारणा पेव्हर ब्लॉक(गट्टू) व नाली कव्हर बांधकाम १२ लाख, चान्ना पेव्हर ब्लॉक(गट्टू) ७ लाख, मानेगाव सिमेंट काँक्रिट रस्ता व बंदिस्त नाली बांधकाम ९ लाख ७३ हजार, लोहारा बंदिस्त नाली सिमेंट काँक्रिट रस्ता व पेव्हर ब्लॉक(गट्टू) १५ लाख २६ हजार, दिघोरी बंदिस्त नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक(गट्टू) ७ लाख ७४ हजार असे एकूण १ कोटी ४४ लाख ३३ हजार रुपयाचे २७ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी कमलकर रणदिवे तथा समाजकल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे यांच्या प्रशासकिय मान्यतेवर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या