Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी

माजी जि.प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी
मो.95459 14324


भंडारा :- लाखनी तालुक्यातील मोगरा/शिवणी येथील दारिद्र्य रेषेखालील तथा गरीब आदिवासी कुटुंबातील निरंजना नंदलाल उईके(४५) हिस विषारी सापाने बोटाचा चावा घेतल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. ती कुटुंबातील कमावती व्यक्ती असल्याने तिचे कुटुंब उघड्यावर आल्यामुळे तिच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे. 
            निरंजना उईके ही माहेरी मोगरा येथे कुटुंबासह वास्तव्यास असून मोलमजुरी चे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. सकाळचे सुमारास ती घरामध्ये भांडे आणावयास गेली असता हाताचे बोटाला काही तरी चावल्यासारखे वाटले असल्याचे समजल्याने या बाबद तिने कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी तिला दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी नेले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. असे माजी जि.प. सदस्य आकाश कोरे यांचे म्हणने आहे. 
              पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला वेळीच उपचार मिळाले असते तर तिची प्राणज्योत मालवली नसती. तसेच ती दारिद्र्य रेषेखालील व आदिवासी कुटुंबातील महिला असून विषारी सापाचे दंशामुळे तिचा मृत्यू झाला असल्याने ती शासकीय मदतीस पात्र आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मृत्यूचे कारणाचा शोध घेण्यासाठी उत्तरीय परीक्षण करण्यात आल्याने त्या महिलेच्या कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या