Ticker

6/recent/ticker-posts

साहित्य दर्पण कला मंच द्वारा डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नागपूर येथे

 
प्रथम वर्धापन दिन ,राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय कवी संमेलन कार्यक्रम संपन्न



संजीव भांबोरे

नागपूर :-साहित्य दर्पण कला मंच नागपूरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलनी, साई मंदिर जवळ वर्धा रोड, नागपूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन सोहळ्याचे आयोजन 11 फेब्रुवारी 2024 रविवारला करण्यात आलेले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद जाधव समूह प्रमुख सल्लागार, लाॅपिंग ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर, कायदेशीर मुंबई, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन संगीता जामने साहित्यिक परभणी यांच्या हस्ते व सह उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अशोकजी टेंभुर्णीकर नागपूर व कैलासजी धोंडणे वनपरिक्षेत्र अधिकारी ब्रम्हपूरी हे उपस्थित होते. संस्थापिका कल्पना अशोक टेंभूर्णीकर नागपूर, प्रमुख अतिथी नरेंद्र पवार, मा. रवींद्रजी जनवार सचिव, गोंडवन विकास संस्था  
नागभीड, डॉ सानिया खान ,प्रा.भीमराव गायकवाड, विलास गजभिये संध्या राजूरकर संपादिका बहुजन सौरभ ,जगदीश राऊत, गणेश मोरे,प्रा.लक्ष्मणजी शहारे,शोभा वेले, सुभाष मानवटकर, मधुकर दिवेकर ,जगदीश राऊत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पहिल्या सत्राचे उद्घाटन सकाळी ९ वाजता करण्यात करण्यात आले .९.३० वाजता संविधान प्रास्ताविकेचे वाचन, १० वाजता पाहुण्यांचा सत्कार, १०.३० वाजता, बाप संग्रहणाचा प्रकाशन लोकार्पण सोहळा ११ वाजता, ११.३० वाजता पुरस्कार वितरण, मान्यवराचे मनोगत १२वाजता नंतर सर्व मान्यवर ,साहित्यिक ,कवी समाजसेक यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
दुसरे सत्र राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन दुपारी २ वाजता सुरू करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुनंदा जुलमे समाजसेविका लेखिका कवयित्री साहित्यकार नागपूर उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद पवार मुंबई ,डॉ नरेंद्र पवार मुंबई, संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य (भंडारा) ,शालिक जिल्हेकर ,मनोहर गजभिये ,माणिक खोब्रागडे, सुधीर मने ,हंसराज शहारे ,महेंद्र दुपारे नारायण बागडे अर्चना चव्हाण, संजय सहारे, प्रकाश दूलेवाले, यावेळी प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदिका छाया जांभुळे ब्रह्मपुरी त्याचप्रमाणे निवेदक सतीश सोमकुवर नागपूर, उपस्थित होते. या राज्यस्तरीय कवी संमेलनात अंगुलीमाल कुराडे चंद्रपूर सुमनताई मनवर यवतमाळ ,संतोष खंडारे वाशिम ,दीपा चंदिले अचलपूर ,कलावती खोरगडे अमरावती ,राम स्वरूप मडावी नांदेड, डॉ प्रसाद मडावी परतवाडा ,दमयंती बहुरूपी अमरावती ,कल्पना लांडे अमरावती, रूपाली देवकर अमरावती, पल्लवी सावळे अमरावती, अविनाश रोडगे अमरावती, रत्ना श्यामकुवर रामटेक ,नरेंद्र गुळघाणे वर्धा, उमा गजभिये गोंदिया ,प्रीती कोपराकडे लाखनी ,रवी ताकसंडे गडचंदुर ,प्राध्यापक रत्नाकर सुखदेवे भंडारा ,सुजाता अवचट आरमोरी, मीरा वासनिक कल्याण गौतम हरिदास गौतम बुटीबोरी ,मोहन सोमलकर नागपूर, संदीप शेंडे नागपूर, प्रणाली चव्हाण रूपाली निखारे नागपूर शैलेशा भुरे नागपूर ,नागोराव सोनकुसरे नागपूर ,विकी रंगारी नागपूर ,देविदास हनुमंते नागपूर ,श्वेता अलोने नागपूर, विशाखा नकाशे नागपूर, वनिता लिचडे पवनी ,राहुल श्यामकुवर रामटेक कल्पना लाडे नागपूर ,मोनाली पोफळे नागपूर ,विद्या निनावे नागपूर ,या कवी व कवियीत्री यांनी राज्यस्तरीय कवी संमेलनात सहभाग घेतला . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कल्पना अशोक टेंभुर्णीकर .प्राध्यापक नानाजी रामटेके. लोकमुद्रा शहारे, वैशाली खंडारे, डॉ हरिश्चंद्र धीवार, माला मेश्राम मुंबई, यांनी सहकार्य केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या