Ticker

6/recent/ticker-posts

केशोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324

भंडारा :- माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून केशोरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवेचे व्रत घेतलेले माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जनतेच्या समस्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवलेले आहे. अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्रातील केशोरी येथे भगवान बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना अभिवादन करून राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने जनहितार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी केशोरी व परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचेसह केशोरीचे सरपंच नंदकुमार गहाणे यांचाही वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजहंस ढोके, प्रकाश गहाने, नंदु गहाणे, विजय गहाने, खोकन सरकार, सुशी गहाने, वडेगावचे सरपंच घनशामज शहारे, डॉ. जतिन मंडल, विलास बोरकर, अविनास कापगते, जितेंद्र साळवे, वैभव गहाने, तेजुकला गहाने, नारायणजी हटवार, मिथुन टेंभुर्णे, श्रीराम शेंडे, रामकृष्ण बनकर, रमेश भजने, विश्वनाथ शेंडे, सचिन घरामी, राजू कावळे, नारायण पाटणकर, रेशीम झोडे, लोकचंद पर्वते, आनंदराव कामातकर, किशोर शेंडे, विश्वनाथ कोरेवर, एकनाथ राणे, निखिल गायकवाड राजकुमार बडोले फौंडेशन चे राकेश भास्कर, प्रशांत शहरे प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या