विजय चौडेकर चित्रा न्युज
नांदेड :-शहरात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागात खड्डे खोदल्या मूळे पाणी साचले तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकला नाही,याची गंभीर दखल मनपा आयुक्त डॉ मोहन कुमार डोईफोडे यांनी घेतली आहे, गुरूवारी आपत्ती व्यवस्थापन व अभियंत्याची बैठक घेऊन प्रत्येकांना कामांचे वाटप केले आहे, दरम्यान शहरात 20 मे, नंतर कोणतेही खोदकाम होऊ नये सद्धा खोदकाम केलेल्या ठिकाणी 30 मे पर्यंत पुर्वरत करा अशा सूचना दिल्या आहेत,कार्यकारी अभियंता सुमंत पाटील यांनी दोन कंत्राटदारांना नोटीस देखील बजावुन खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत,महापालीका क्षेत्रात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे,फोरस्ट्रेस ईन्फाकाॅल,लि, ठाणे, में यश ईनोव्हेट्यू सोल्युशन ,एल,एल,पी औरंगाबाद, आणि शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी नांदेड, यांनी मनपा हद्दीत 20. मे च्या नंतर खोदकाम करु नये, 20 मे पर्यंत पुर्वरत काम पूर्ण करावे दंडात्मक कारवाई करण्यात येईल,


0 टिप्पण्या