हर्षवर्धन देशभ्रतार
सांगली :- शंभर फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या धारकाऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली. कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं. याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आला होत. आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. कॅफे मध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे. या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकऱ्यांनी केली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


0 टिप्पण्या