रवी भोंगाने साकोली
साकोली- नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १२ परीक्षेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत नवजीवन विद्यालय अँड ज्यु. सायन्स कॉलेज जमनापूरने याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली. कु. मेहविष पटेल ९५.५० टक्के गुण मिळालेले असून विज्ञान शाखेतील भंडारा जिल्ह्यातून व शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु. हितांची गडेकर हिला ८५ ,८३ टक्के गुण मिळवून ती शाळेतून व्दितीय तर खुशी सोडेजा ८३.३४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. विज्ञान शाखेत परीक्षेला एकुण १०४ विद्यार्थी बसलेले होते. यात ९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४० विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तर ४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व शिक्षकांना दिले. सदर शाळा पूर्व विदर्भातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळख असलेल्या वैनगंगा बहु-उद्देशीय विकास संस्थेची शाळा आहे. " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " स्पर्धेत साकोली तालुक्यात, भंडारा जिल्ह्यात प्रथम, नागपूर विभागात तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. या शाळेचा मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्याच्या हस्ते मुंबई येथे गौरव करून ११ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. नवजीवन विद्यालयाने परीसरात दर्जेदार व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशाची परंपरा नेहमी प्रमाणे कायम राखण्यात यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबददल संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रह्नमानंद करंजेकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. वृंदाताई करंजेकर, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे, व शाळेचे शिक्षक प्रकाश बडवाईक, दिलीप चौधरी, मुकेश येसनसुरे, अमोल वाकडे, , चंद्रकला बिसने, अर्चना नवखरे, अल्का गोंधळे, प्रीती साखरे, दिलीप गहाणे, विष्णू गाढवे, संगीता खुणे तसेच शिक्षकत्तेर कर्मचारी मुनिश्वर करंजेकर, मुकेश साखरे, राकेश चकोले, सुरज नंदेश्वर, हेमराज सयाम, प्रमोद डोंगरवार व इतर कर्मचारी यांनी कर्मचारी अभिनंदन केले.


0 टिप्पण्या