Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम...

                        
लिंगोजी कदम चित्रा न्युज 


नांदेड :-जिल्हातिल किनवट, येथील बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.बारावी वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे.बारावी विज्ञान शाखेचा ९८ टक्के तर कला शाखेचा ७० टक्के   निकाल लागलेला आहे. विज्ञान शाखेतील सिरमनवार तनुश्री नरेंद्र   या विद्यार्थीनिने ८७.३३ ,बारापात्रे प्रियंका राजू  ८३.६७ ,बंडे शिवम जयराम ८१ टक्के  तर बारावी कला शाखेतून तरटे मोहन प्रकाश ६४ टक्के, आडे सोना बंडू  ६३.६७ टक्के, गिनगुले मनिषा मधुकर ६२.१७ टक्के, वाणिज्य शाखेतून  जाधव चंद्रशेखर विश्वनाथ ९०.६७, पवार तन्मय मदन ८८.०० टक्के, दराटे रुद्राक्ष माधव  ८१.३३ टक्के  घेऊन महाविद्यालयातून प्रथम,व्दित्तीय ,तृत्तीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.  यासह २० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर एकुण ७४ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने गुणवंता सिद्ध करुन शैक्षणिक क्षेत्रातील या गंगणझेपीमुळे किनवट परिसरातील नामांकित महाविद्यालयाने आपले नांव लौकिक केले आहे.बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे किनवट शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,उपप्राचार्य  डॉ. पंजाब शेरे, पर्यवेक्षक  प्रा. अनिल पाटील,कार्यालयीन अधिक्षक यमुना कुमरे  यांच्यासह सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या