Ticker

6/recent/ticker-posts

गरजू रूग्णास वेळेवर रक्तदान केल्या बद्दल शेख इसाक यांचा सत्कार


हरदीपसिंग बावरी परभणी 
परभणी :- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रूग्णास B+ पॉझिटिव्ह रक्त गटाची आवश्यकता होती. तेव्हा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक्क संरक्षण समिती, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ वतीने खिदमदगार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख इसाक यांनी दिनांक 22 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून सदरील रूग्णास रक्त उपलब्ध करून दिले आहे. रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक्क संरक्षण समिती, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ , दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ च्या वतीने रक्तदाते शेख इसाक यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक येथील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन प्रमोद अंभोरे व दिलीप बनकर यांनी शहरातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष  तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे, रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, दयावान सरकार महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पंचांगे, रेखाताई गायकवाड, शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी, समाजहित न्युज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख अझहर आदींसह रुग्णाचे नातेवाईक व ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या