लाखांदूर-वडसा मार्गावरील घटना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- कापड दुकानात बैलगाडीने बांधकाम साहित्य देऊन घरी परत येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने बैलगाडीला धडक दिल्याची घटना गुरुवारी(ता.९मे) रोजी ९:३० वाजता मिरा कन्हैय्या मंगल कार्यालय परिसरात घडली. लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जखमी दुचाकी चालकाचे नाव धनराज कोड्डे रा. पिंपळगाव/कोहळी असे आहे. लाखांदूर पोलिस तपास करीत आहेत.
हरिदास राऊत(४९) या शेतकऱ्याने गुरुवारी आपल्या बैलगाडीतून काही बांधकाम साहित्य स्थानिक कापड दुकानात नेले होते. साहित्य दिल्यानंतर लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गाच्या फूटपाथ ने घराकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्प्लेंडर क्रमांक एमएच ३५ क्यू ०२०४ ने बैलगाडीला समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीस्वार महामार्गावर पडून गंभीर जखमी झाला. घटनास्थळालगत असलेल्या व्यापार संकुलातील नागरिकांच्या निदर्शनास अपघात येताच जखमी दुचाकीस्वारास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. बैलगाडी चालकाचे फिर्यादी वरून दुचाकी चालका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शन तपास सुरु आहे.


0 टिप्पण्या