Ticker

6/recent/ticker-posts

वैनगंगेत उडी घेतलेल्या महिलेचे वाचविले प्राण

कारधा जुन्या पुलावरील घटना

महिलेची प्रकृती धोक्याबाहेर

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडाराः पती-पत्नीत झालेल्या भांडणात पत्नीने टोकाचे पाऊल उचलत कारधा जुन्या पुलावरुन वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिथे मासेमारी करणाऱ्या उपस्थित नागरिकांच्या  समयसुचकतेने  तिचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्या नागरिकाने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन महिलेला वाचविले. रोशनी शत्रुघ्न मोहनकर वय ३६ रा. लाखनी, असे त्या महिलेचे नाव आहे. ती लाखनी येथे नगरपंचायत मागे वास्तव्यास असून पती व पत्नी भाजीपाल्याच्या व्यवसाय करतात.तर प्रवीण खंगार असे जीव वाचवणाऱ्या सुजाण नागरिकाचे नाव आहे. यावेळी कारधा पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सहकार्य केले.  
               शत्रुघ्न मोहनकर व पत्नी रोशनी हे भाजीपाल्याचा व्यवसाय करीत आहेत. पती-पत्नीत झालेल्या भांडणात पत्नीने रागाच्या भरात घराबाहेर पडून कारधा वैनगंगा नदी गाठली. तिने कारधा जुन्या पुलावरुन वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या नागरिकांना महिला नदीपात्रात उडी घेतल्याचे दिसून येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता वैनगंगेत उडी घेऊन त्या महिलेला वाचविले. माहिती मिळताच कारधा पोलीसांनी  घटनास्थळी जाऊन महिलेला पाण्याबाहेर काढण्यात सहकार्य केले. सदर महिलेला जिल्हा सामान्य  रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या