Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्षाचे घरासमोरून दुचाकी चोरी


• प्रभाग क्रमांक १ लाखांदूर येथील घटना 

• अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- अज्ञात इसमाने सूना मौका पाहून घरासमोर ठेवलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना बुधवार(ता.२२) रोजी मध्यरात्री २:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांचे फिर्यादी वरून लाखांदूर पोलिसांना गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार संतोष चव्हाण तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत चोराचा शोध लागला नव्हता. या घटनेमुळे शहरवासियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
                  विनोद ठाकरे हे लाखांदूर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष असून त्यांचेकडे इलेक्ट्रिक बजाज चेतक कंपनीची दुचाकी असून क्रमांक एमएच ३६ एएम ८४४४ आहे. दिवसभर सर्व कामे आटोपून सायंकाळचे सुमारास ते घरी आले व दुचाकी घरासमोर पार्क करून ठेवली. रात्री जेवण करून सर्व कुटुंबीय झोपी गेले. मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने सूना मौका पाहून दुचाकी चोरून नेली. झोपेतून उठल्यानंतर दुचाकी चोरी गेल्याचे कुटुंबियांचे निदर्शनास आल्याने नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी पोलिस ठाणे गाठून कर्तव्यावरील पोलिस अधिकाऱ्यांना घडलेली घटना सांगितली. त्यांचे फिर्यादी वरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार संतोष चव्हाण तपास करीत आहेत. या आधीही नगर पंचायतीच्या आवारातून घनकचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून एक महिन्या अगोदर २ बॅटऱ्या आणि स्टेफनी चोरी गेली होती. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे शहरवासियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या