आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी व्यापक व परिणामकारक कारवाईचे निर्देश
हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
सातारा:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या संबंधाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघासाठी 43 स्थायी निगरानी पथकांची (एसएसटी) पथकांची तर 35 भरारी निगरानी पथके (एफएसटी ) कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यामध्ये पथकांमध्ये सीएपीएफ- एसएपी- एसआरपीएफ मधील जवानांची तात्काळ नेमणूक करण्यात आली असून या मनुष्यबळाने आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी व्यापक व परिणामकारक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
मतदान प्रक्रीयेच्या शेवटच्या 72 तासांमध्ये आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे, निवडणूक प्रक्रीया शांततेत व पारदर्शी व भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी. यासाठी सदरचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
सातार जिल्ह्यात 45 सातारा लोकसभा मतदार संघामध्ये 256- वाई - 7 एसएसटी 6 एफएसटी, 257- कोरेगाव- 3 एसएसटी 3 एफएसटी, 259 कराड उत्तर- 5 एसएसटी 5 एफएसटी, 260- कराड दक्षिण- 5 एसएसटी 4 एफएसटी, 261 पाटण- 4 एसएसटी 4 एफएसटी, 262 -सातारा- 7 एसएसटी 4 एफएसटी.
43- माढा लोकसभा मतदार संघात 255-फलटण- 5 एसएसटी 5 एफएसटी आणि 258- माण- 7 एसएसटी 4 एफएसटी अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पथकांकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडील मनुष्यबळ पुरविण्यात आले आहेत. या एसएसटी व एफएसटी मधील मनुष्यबळाच्या मदतीसाठी सीएपीएफ- एसएपी- एसआरपीएफ कंपनीकडील एक हाफ सेक्शन 4 मे पासून 6 मे पर्यंत पुरविण्यात आलेले आहेत. सदर मनुष्यबळाने एसएसटी व एफएसटी पथकांमधून आचारसंहितेच्या काटेकोर पालनाच्या दृष्टीकोनातून परिणामकारक व व्यापक स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.


0 टिप्पण्या