Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरित्या गांजा बाळगुन वाहतुक करणाऱ्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही तब्बल ०३ किलो १८५ ग्राम वाळलेला गांजा किं. ७९,६२५ रुपये व मो. सायकल किं. ३०,००० रु असा एकुण १,०९,६२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त

०१ इसमा विरुध्द पोस्टे बाळापुर येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

मोईन कादरी हिंगोली

हिंगोली:-मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि श्री. विकास पाटील यांना दिले होते.

त्या अनुषंगाने दिनांक २१/०५/२०२४ रोजी स्थागुशाचे सपोनि . राजेश मलपिलु यांचे पथक पोस्टे बाळापुर पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, नांदेड ते बाळापुर रोडने एक इसम अंमली पदार्थ गांजा घेवुन मो. सायकलने डोंगरकडा कडे येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशा च्या पोलीस पथकाने पंचासह दुपारी १४.२० वा दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी डोंगरकडा परीसरात गोपनिय पद्दतीने व साध्या वेशात सापळा रचुन इसम नामे इद्रीस अब्बासखान पठाण रा. जवळा पांचाळ यास मो. सायकलसह पकडुन त्याचे ताब्यातुन विक्री करीता बाळगुन आणलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला अमली पदार्थ वाळलेला (गांजा) वनज ३.१८५ किलो ग्रॅ. किमती ७९,६२५ रू व मो. सायकल किं. ३०,००० रु असा एकुण १,०९,६२५ रुपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने जप्त केला. त्यावरून पोस्टे बाळपुर येथे नमुद इसमाविरूध्द कलम २० (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे सपोनि राजेश मलपिलु यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक  जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक  अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.  विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. . राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या