Ticker

6/recent/ticker-posts

बारावीच्या परीक्षेत जामखेड तालुक्याचा निकाल ९५.४७ % , जिल्ह्यात दुसरा नंबर !


सुजित धनवे चित्रा न्युज 
जामखेड - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला .यामध्ये जामखेड तालुक्याचा निकाल ९५. ४७ टक्के लागला असून शेवगांव तालुक्याचा निकाल ९५. ६२ टक्के लागला आहे . या तालूक्यानंतर जामखेड तालुक्याचा सर्वांधिक निकाल लागला असून नगर जिल्ह्यात जामखेड तालुका दुसऱ्या स्थानी आहे .                                   
       फेब्रुवारी/मार्च २०२४ ला बारावी ची परीक्षा कॉफि मुक्त व अतिषय आनंदी वातावरण घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा कॉफिमुक्त व तणावमुक्त वातावरणात कशी  होईल यासाठी प्रयत्न केले होते. व त्याचे फळ काल जाहीर झालेल्या निकालातून दिसून आले .                                                               
      सर्व गुणवंत व यशस्वी विदयार्थ्याचे जामखेड तालुक्याचे तहसिलदार श्री. गणेश  माळी, गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ , पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील , गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे , सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या