Ticker

6/recent/ticker-posts

अवैध मुरूम वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पकडली

केसलवाडा/वाघ फाटा येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

• ५ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी शहरातील केसलवाडा/फाटा परिसरात अवैधरित्या विना रॉयल्टी ने मुरूम वाहतूक करतांना स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर मिळून आल्याची घटना मंगळवारी(ता.१४) रोजी उघडकीस आली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकवर लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचेकडून ५ लाख ४ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नरेंद्र दौलत भोयर(३९) रा. सिपेवाडा असे आरोपींचे नाव असून पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे. या कारवाईने अवैध गौण खानिज व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 
               शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात महसूल विभागाचे आशीर्वादाने खुलेआम गौण खनिजाची वाहतूक होत असते. केसलवाडा/फाटा परिसरात अवैधरित्या मुरुमाची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती वरून लाखनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी केसलवाडा/वाघ फाटा परिसरात १ निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एजी ५१२० व ट्राली क्रमांक एमएच ३५-५६५९ मध्ये विना परवाना मुरूम भरून वाहतूक करतांना आढळून आल्याने जप्त करून पोलिस स्टेशन ला आणण्यात आले. यात ५ लाख ४ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक १८५/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे तपास करीत आहेत. या कारवाईने गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या