राजेगाव/मोरगाव येथील घटना
लाखनी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी तालुक्यातील राजेगाव/मोरगाव येथे ४० वर्षीय इसमाने नैराश्यातून घराच्या मागच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार(ता.१४) रात्री १०:०० वाजताच्या सुमारास घडली. राजेश प्रल्हाद रहांगडाले(४०) रा. राजेगाव/मोरगाव असे मृतकाचे नाव आहे. नोकरी न लागल्याने व लग्न न झाल्याचे नैराशातुन दारूच्या आहारी जाऊन दारुच्या नशेत आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.
मृतक राजेश हा सुशिक्षित बेरोजगार होता. शिक्षण घेऊन नोकरी न लागल्याने व लग्न न झाल्याने नैराश्यातून दारूच्या आहारी जाऊन दारूच्या नशेत घराच्या मागील बाजूस(सांदवाडीतील) असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. घेटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. तसेच सर्व सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. बुधवारी(ता.१५) रोजी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकोश तिलकचंद रहांगडाले यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार योगिता सिंगनजुडे तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या